Surprise Me!

दिड महिन्यापूर्वी आम्ही देखील ५० थरांची दहीहंडी फोडली | Eknath Shinde | Devendra Fadanvis

2022-08-20 1 Dailymotion

यंदाची दहीहंडी ही ख-या अर्थाने हिंदुत्वांची हंडी आहे. गोविंदा हे आपली परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम करीत असतात. आज गोविंदांच्या चेह-यांवर प्रचंड उत्साह जाणवत आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे दही हंडी उत्सवावर निर्बंध होते. परंतु उपमुख्यमंत्री व आम्ही ठरविले की, सर्व सण-उत्सव राज्यात जल्लोषात साजरा व्हायला पाहिजेत. तुम्ही दहीहंडी मधील हंडी फोडत आहात. आम्ही पण दिड महिन्यापूर्वी ५० थर लावून मोठी हंडी फोडली. त्यामुळे आज या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी व भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. त्यामुळे येणारे सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुया , आपली संस्कृती व परंपरा पुढे नेऊया व राज्य सर्व सामान्यांचे आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे सरकार आहे. सर्व सामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.<br /><br /><br />#EknathShinde #UddhaThackeray #Shivsena #BJP #DevendraFadnavis #Udaysamant #SanjayShirsat #AbdulSattar #SanjayRathod #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon